इंडिया स्किल्स अहवाल-2023 मध्ये माहिती ः 22 ते 25 वयोगटातील तरुणांचा समावेश अधिक
नवी दिल्ली
जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या आपल्या देशासाठी आनंदाची बातमी आहे. 22-25 वयोगटातील तरुणांपैकी 56टक्के रोजगारक्षम आहेत, जे सर्व वयोगटांमध्ये सर्वाधिक असल्याचा दावा इंडिया स्किल्स रिपोर्ट-2023 च्या अहवालामध्ये केला आहे.
देशातील 3.75 लाख उमेदवारांच्या वेबबॉक्स नॅशनल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट (डब्लूएनइटी) आणि 15 हून अधिक उद्योगांमधील 150 कंपन्यांवर केलेल्या इंडिया हायरिंग इंटेंट सर्वेक्षणात वरील बाब समोर आली आहे. त्यानुसार देशातील 50.3 टक्के लोक रोजगारासाठी पात्र आहेत, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक असल्याची नेंद केली आहे. 2022 च्या अहवालात हा आकडा 46.2टक्के इतका होता.
सर्वात रोजगारक्षममध्ये युपी व महाराष्ट्र अव्वल
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश हे रोजगारक्षमतेच्या यादीतही अव्वल आहे. येथे 72.7 टक्के लोक रोजगारासाठी पात्र आहेत. महाराष्ट्र 69.8 टक्क्यासह दुसऱया क्रमांकावर आहे. मागील भारत कौशल्य अहवालात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश देखील टॉप-2 मध्ये होते. ताज्या अहवालात दिल्ली तिसऱया, आंध्रप्रदेश चौथ्या, राजस्थान पाचव्या, कर्नाटक सहाव्या, तेलंगणा सातव्या, पंजाब आठव्या, ओडिशा नवव्या आणि हरियाणा दहाव्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, 0-2.6 लाख रु. वार्षिक पॅकेजची अपेक्षा करणारे बहुतेक तामिळनाडूत आहेत. इंडिया स्किल्सच्या शेवटच्या अहवालात बीटेक उत्तीर्ण हे नोकऱयांसाठी सर्वात योग्य असल्याचे म्हटले होते. मात्र, ताज्या अहवालात बीकॉमच्या लोकांनी त्याला थम्सअप दिले आहे. 61 टक्के बीकॉमधारक रोजगारासाठी योग्य असल्याचे आढळले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या क्षेत्रातील सुवर्ण संधी…
2023 मध्ये, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि इंटरनेट व्यवसायात सर्वाधिक नोकऱया मिळण्याची अपेक्षा
ऑटोमोटिव्ह क्षेत्रात, सर्वाधिक 39 टक्के भरती 1-5 वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी आहे.









