निळ्यावरून झाला हिरवा
20 वर्षांमध्ये समुद्राचा रंग बदलला आहे. समुद्राचा रंग आता निळा नव्हे तर हिरवा झाला आहे. याचा प्रभाव सागरी जीवांसोबत सागरी खाद्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर पडणार असल्याचे म्हणत वैज्ञानिकांनी याकरता हवामान बदलाला जबाबदार ठरविले आहे.
हवामान बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर फाइटोप्लँकटन (समुद्रात आढळणारे छोट्या रोपांसारखे दिसणारे जीव) वाढले आहेत. हे जीव मरीन लाइफला नियंत्रित करतात. या फाइटोप्लँकटनमध्ये रोपांप्रमाणेच हिरवा क्लोरोफिल असतो. याचमुळे पाण्याचा पृष्ठभाग हिरवा दिसून येत आहे. समुद्राचा बदललेला रंग धोक्याचा इशारा देणारे आहे. कारण फाइटोप्लँकटन वाढल्याने समुद्रात डेडझोन वाढत आहे. या डेडझोनमध्ये सागरी जीवांना श्वास घेता येत नाही आणि यामुळे त्यांचा मृत्यू ओढवत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
फाइटोप्लँटकन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. तर दुसरीकडे समुद्रात राहणारे अन्य जीव जिवंत राहण्यासाठी याच ऑक्सिजनला शोषून घेतात. फाइटोप्लँकटन वाढल्याने समुद्रात जीव-जंतूंसाठी जागा कमी होत आहे. अशा स्थितीत डेड झोन वाढत आहे.

समुद्राचा रंग बदलण्याचा परिणाम
मानवी जीवन देखील सागरी जीवनावर अवलंबून आहे. माणूस सागरी खाद्याचे सेवन करतो. मत्स्यशेती करत असतो, पाण्याच्या आसपास विविध पिके घेत असतो. समुद्रात डेड झोन तयार झाल्याने मरीन लाइन संपुष्टात येईल आणि अशा स्थितीत माणसांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.
उपग्रहीय डाटाद्वारे खुलासा
पाण्याच्या बदललेल्या रंगाला कुठलाही माणूस सहजपणे पाहू शकत नाही. याचमुळे याचा खुलासा 2002 ते 2022 दरम्यानच्या उपग्रहीय डाटाद्वारे झाला आहे. डाटानुसार 56 टक्के समुद्राचा रंग निळ्याऐवजी हिरवा झाला आहे. आम्ही जो बदल पाहत आहोत, तो अत्यंत भीतीदायक आहे. हा बदल हवामान बदलामुळे होत असल्याचे उद्गार मॅसाचुसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिक स्टेफनी डुटकिविक्ज यांनी काढले आहेत.
इकोसिस्टीम प्रभावित होतेय
ब्रिटनच्या साउथहॅम्प्टनमध्ये नॅशनल ओशनोग्राफी सेंटरच्या ओशन अँड क्लायमेट सायंटिस्ट आणि संशोधनाचे प्रमुख लेखक बीबी कॅल यांच्या नेतृत्वात टीमने हे संशोधन केले आहे. आम्ही निम्म्याहून अधिक महासागरांच्या पाण्यावर संशोधन केले आणि त्यातील रंगांमध्ये झालेल्या बदलाचा शोध घेतला. या अध्ययनात माणूस इकोसिस्टीमला अत्यंत गंभीर स्वरुपात प्रभावित करत असल्याचे आढळून आल्याचे कॅल यांनी सांगितले आहे. हवामान बदलाचा हा परिपाक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









