155 स्पर्धकांचा सहभाग; उद्घाटन सोहळय़ात मान्यवरांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ बेळगाव व बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 56 व्या बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी पी. व्ही. स्नेहा, संजय सुंठकर, निमा काकतकर, दिगंबर पवार, संजय मोरे, शिवाजी हंडे, नारायण चौगुले, संजय चव्हाण, किरण पाटील, महादेव चौगुले, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मराठा युवक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, रघुनाथ बांडगी, चंद्रकांत गुंडकल, मारूती देवगेकर, आशिया पंच अजित सिद्दण्णावर, एम. के. गुरव, जे. निळकंठ, रणजित मन्नोळकर, नारायण चौगुले, अविनाश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी एम. के. गुरव यांनी डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांचा परिचय करून दिला. बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. दिगंबर पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. हनुमान मूर्तीचे पूजन नारायण किटवाडकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डीसीपी पी. व्ही. स्नेहा, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव, बाळासाहेब काकतकर, नम्रता देवगेकर, रविंद गडादी, अजित सिद्दण्णावर, मारूती देवगेकर, मारूती चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या कार्याबद्दल खास सत्कार करण्यात आला.
सदर स्पर्धेत 155 स्पर्धकांनी भाग घेतला असून, 55 ते 85 किलोवरील अशा सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उमा महेश, गंगाधर एम., हेमंत हावळ, बसवराज अरळीमट्टी, सुनील राऊत, सुनील पवार, सुनील आपटेकर, नूर मुल्ला, वासुदेव साखळकर यांनी पंचाची भूमिका बजावली. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.