एसीपी एन. व्ही. बरमनी यांचा समावेश
राज्यातील 55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री गृह खात्याने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांचा समावेश आहे.
एन. व्ही. बरमनी यांची बदली खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली असून त्या जागेवर गुप्तचर विभागातील सदाशिव कट्टीमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरुच राहणार असून राज्यातील आणखी काही अधिकाऱयांच्या बदल्या होणार आहेत.









