पाकिस्तानी ड्रोन आकाशातच केले नष्ट
भारतीय वायुदलाची हवाई सुरक्षा शक्ती आता कुणापासूनच लपून राहिलेली नाही. पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारताच्या मजबूत हवाई सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला आहे. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रs आकाशातच नष्ट करण्यात आली. आमच्या देशाचे नागरिक सुरक्षित राहतील हे हवाई सुरक्षा छत्र सुनिश्चित करते. पाकिस्तानच्या विरोधात सीयूएएस, पिकोरा, समर आणि एडी तोफांचा वापर करण्यात आल्याचे वायुदलाकडून सांगण्यात आले. वायुदलाची अभेद्य हवाई सुरक्षा प्रणाली सतर्क होती. शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला संतुलित प्रकारे प्रत्युत्तर देण्यात आले, यात पिकोरा अग्रणी होती.
पिकोरा हवाई सुरक्षा यंत्रणा
पिकोराला एस-125 नेवा नावाने ओळखले जाते. 1970 च्या दशकात ही यंत्रणा भारताच्या वायुदलाशी जोडली गेली. ही यंत्रणा मानवरहित यानांसह अनेक हवाई धोक्यांच्या विरोधात विश्वसनीय ढाल प्रदान करते. पिकोरा सोव्हियत निर्मित मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली कमी ते मध्यम उंचीवरील लक्ष्यांना भेदण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
आकाशातच शत्रूला करते नष्ट
या सिस्टीममध्ये रडार-निर्देशित मिसाइल लाँचर आणि फायर कंट्रोल युनिट सामील आहे. सर्वसाधारणपणे व्ही-600 क्षेपणास्त्राचा वापर करते. लक्ष्यांचा शोध घेणे, ट्रॅक करणे आणि त्यांना लॉक करण्यासाठी 5 पॅराबोलिक एंटेनाद्वारे युक्त 4आर90 याटागन रडारचा वापर ही प्रणाली करते. शत्रूच्या धोक्याची ओळख पटल्यावर त्याला आकाशातच ही प्रणाली नष्ट करते.
कमी उंचीवर अधिक घातक
पिकोरा प्रणाली कमी वेग किंवा कमी उंचीवरील लक्ष्याच्या विरोधात प्रभावी आहे. ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्राचा सामना करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. स्वतंत्र स्वरुपात किंवा मोठ्या, इंटिग्रेटेड एअर डिफेन्स नेटवर्कच्या हिस्स्याच्या स्वरुपात ही काम करते.
पिकोरा हवाई सुरक्षा प्रणालीची वैशिष्ट्यो…
मारक पल्ला : पिकोरा प्रणालीचा मारक पल्ला 30-35.4 किलोमीटरपर्यंत आहे. काही अत्याधुनिक वर्जन 35.4 किमीपर्यंत पोहोचू शकतात.
उंची : 20 मीटरपासून 25 किलोमीटरच्या उंचीपर्यंत उडत असलेल्या लक्ष्यांना भेदण्याची यात क्षमता आहे.
टार्गेट : प्रणालीचा रडार 100 किलोमीटर अंतरावरूनच टार्गेटला ट्रॅक करू शकतो.
अचूकता : पिकोराची मारकक्षमता 92 टक्क्यांच्या आसपास आहे. ही 900 मीटर/सेकंदाच्या वेगाने एकाचवेळी दोन लक्ष्यांवर निशाणा साधू शकते.









