नवी दिल्ली : गेल्या वर्षात देशातील नक्षली कारवायांमध्ये 55 टक्क्यांनी घट झाली असल्याची माहीती गृहमंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण आणि कृती आराखड्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे ही घट झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या 2021-22 च्या वार्षिक अहवालानुसार, देशातील हिंसक घटनांमध्ये एकूण 55 टक्के घट झाली आहे. पुर्वी सरासरी 1,136 असलेल्या या दहशतवादी कारवाया कमी होऊन त्या 509 पर्यंत घसरल्या आहेत. तर माओवादी अतिरेकी संघटनांच्या हिंसक कारवाईमध्ये 63 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यांच्या या कारवाया 397 हून 147 इतकी खाली घसरली आहे. 2020 च्या तुलनेत, 2021 मध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये 24 टक्के घट झाल्यामुळे मृत्यूंमध्ये 20 टक्के घट झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, सरकारने राष्ट्रीय दहशतवादी धोरण आणि कृती आराखड्यांच्या कठोर अंमलबजावणीमुळे देशभरातील डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









