अधिकतर भरतीही तंत्रज्ञान क्षेत्रात – वेतन व बोनसही वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीला भारतीय अर्थव्यवस्था चांगल्यापैकी तोंड देत असून येणाऱया काळामध्ये विविध कंपन्यांकडून नव्या उमेदवारांची भरती होणार आहे. व्यावसायिक रिक्रूटमेंट सेवा देणाऱया मायकल पेज या फर्मने यासंदर्भात एक संशोधन अहवाल सादर केला आहे. ज्याअंतर्गत येणाऱया काळात 53 टक्के कंपन्या कर्मचाऱयांची संख्या वाढविणार आहेत.
दरम्यान मागच्या वषी म्हणजेच 2020 मध्ये भरती प्रक्रियेमध्ये 18 टक्मक्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली होती. ई कॉमर्स कंपन्या 12 टक्के लोकांना आपल्या व्यवसायामध्ये सामावून घेणार आहेत. या व्यतिरिक्त सर्वाधिक नोकरभरती ही तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येते. देशातील 74 टक्के कंपन्या उमेदवारांची संख्या वाढविणार आहे. बांधकाम कंपन्यांकडून 44 टक्के इतक्मया जणांना सामावून घेतले जाणार आहे.
वेतनात वाढ
फर्मच्या अहवालानुसार यंदा 60 टक्के कंपन्या कर्मचाऱयांचे वेतन वाढविण्याचा विचार करणार आहेत. त्याचप्रमाणे 55 टक्के कंपन्या बोनस देण्याचाही विचार करीत आहेत. यातील 43 टक्के कंपन्या एक महिन्याचे वेतन बोनस रुपामध्ये कर्मचाऱयांना देणार आहे. हेल्थ केअर सेक्टर क्षेत्रातील उमेदवारांना वेतनामध्ये 8 टक्के इतकी वाढ तर एफएमसीजी आणि ई कॉमर्स व इंटरनेट सेवा देणाऱया क्षेत्रात काम करणाऱयांना 6 टक्क्मयांपर्यंत वाढ मिळण्याची शक्मयता आहे.
कोरोना काळामध्ये बंद पडलेल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कामकाजाला वेगाने सुरुवात केली आहे. वाढत्या कामाची गरज लक्षात घेऊन कंपन्या आता नव्या उमेदवारांच्या भरतीमध्ये लक्ष घालत आहेत. यातील 47 टेक कंपन्या वर्क फॉम होमसारख्या प्रणालीचा वापर करण्यावर भर देत आहेत.









