मुंबई
भारतात सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील 52 टक्के फर्मस्वर सायबर हल्ला झाल्याची माहिती सायबर सुरक्षा संबंधीची जागतिक फर्म सोफोस यांनी दिली आहे. सदरचे हल्ले वाढण्याचे प्रमाण हे गेल्या वर्षभरातले आहे. यातील जवळपास 71 जणांनी मत नोंदवताना गंभीर आणि अतिगंभीर स्वरूपाचा सायबर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अनेक फर्मस्ना यातून सावरण्यासाठी साधारणपणे आठवडय़ाचा कालावधी लागला आहे तर काहींना त्याहीपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.









