कुडाळ
कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व मिळून एकूण 1035 प्रकरणापैकी 51 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात 38 लाख 13 हजार 504 एवढी रक्कम वसूल करण्यात आली. येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. वकील राजीव बिले, वकील सुरेंद्र मळगावकर ,सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमृता मिरजे तसेच अन्य वकील व पक्षकार यांच्या उपस्थितीत झाले. या अदालतीचे कामकाज पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश जी ए.कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व वकील राजीव बिले,वकील सुरेंद्र मळगावकर यांच्या उपस्थितीत पार पडले .या अदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण 129 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 40 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच वादपूर्व 906 प्रकरणांपैकी 11 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण 1035 प्रकरणापैकी 51 प्रकरणे निकाली काढून 38 लाख 13 हजार 504 एवढ्या रकमेची वसुली करण्यात आली. सदर अदालत यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा ,युनियन बँक ,महाराष्ट्र ग्रामीण बँक, कॅनरा बँक व सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी तसेच वीज वितरण कंपनी यांचे लेखापाल उपस्थित होते .सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे काम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक सी .एस.नाईक , एस.डब्ल्यू पै तसेच न्यायालयाचे कर्मचारी लघुलेखक एल .डी .सावंत, वरिष्ठ लिपिक आर. टी .आरेकर ,एम. बी.भाटकर, कनिष्ठ लिपिक सौ. एस .के. म्हाडगूत ,श्रीमती पी.डी . केळुसकर, अमृता हुले, चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री कारेकर, श्री रेडकर, श्री चव्हाण यांनी परिश्रम घेतले.









