प्रभासची नायिका म्हणून चित्रपटात झळकणार
दीपिका पदूकोन सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘83’ वरून चर्चेत आहे. यात ती रणवीर सिंहसोबत दिसून येणार आहे. कबीर खानकडून दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर हा कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पूर्ण केल्यावर दीपिकाने प्रभास स्टारर चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे.
नाग अश्विन यांचा पुढील चित्रपट ‘प्रोजेक्ट के’मध्ये मुख्य भूमिकेत प्रभास तर दीपिका नायिका म्हणून झळकणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत दिसून येतील. हैदराबादमध्ये चित्रिकरणासाठी पोहोचलेल्या दीपिकाचे सेटवर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

‘महानती’ फेम दिग्दर्शक नाग अश्विन आणि त्यांच्या टीमने दीपिकाचे सेटवर पारंपरिक तेलगू पद्धतीने स्वागत केले. दीपिकाने इन्स्टाग्रावर याची माहिती दिली आहे. नाग अश्विन यांच्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. सध्या ‘प्रोजेक्ट के’ नाव देण्यात आले आहे. अमिताभ बच्चन स्वतःच्या हिस्स्याचे चित्रिकरण यापूर्वीच पूर्ण पेले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. दीपिकाला या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.









