बेळगाव – गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या साथीमुळे शाळांची चिंता वाढली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना डोळ्यांची साथ आल्याने विविध भागातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना घरी राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये डोळ्यांच्या साथी बाबत शिक्षक व विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे शिक्षण विभागाने आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डोळे आलेल्या विद्यार्थ्यांना घरी राहण्याची सूचना आरोग्य खात्यातर्फे करण्यात आली आहे . त्यानुसार शाळांना माहिती दिली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना डोळे आल्याने त्यांनाही घरी थांबण्याची सूचना केली आहे. अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे









