महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचीही घोषणा
वृत्तसंस्था/ नरसिंगपूर
मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. निवडणुका जवळ आल्याने विविध पक्षांच्या नेत्यांकडून जनतेला लोकोपयोगी आश्वासने देण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. जबलपूर विभागातील नरसिंगपूर जिह्यात रविवारी झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आपले सरकार स्थापन केल्यानंतर 500 रुपये गॅस सिलिंडर आणि महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी नरसिंगपूर येथील जाहीर सभेत बोलताना, राज्यात काँग्रेसचे सरकार येताच 500 रुपयांना गॅस सिलिंडर देऊ असे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. याशिवाय महिलांना दरमहा रु. 1500 देण्याची घोषणाही त्यांनी केली. रविवारी नरसिंगपूरमध्ये निवडणूक प्रचारसभेत संबोधित करताना कमलनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला.









