आजपर्यंत एकही वाहन धावले नाही
ब्रिटनमध्ये एक घोस्ट जंक्शन असून त्याचे नाव एम49 आहे, याच्या निर्मितीत 50 दशलक्ष युरो (500 कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम खर्च झाली आहे. तरीही याचा वापर कधीच करण्यात आला नाही. या जंक्शनवरून आजवर एकही कार धावलेली नाही. 2019 मध्ये निर्मिती पूर्ण झाल्यावर अखेर आता हे जंक्शन आसपासच्या रस्त्यांशी जोडले जाऊ शकते. जेणेकरून लोक याचा वापर करू शकतील. दोन किंवा दोनहून अधिक रस्ते जोडले जाणाऱ्या स्थानाला जंक्शन म्हटले जाते.

ग्लॉस्टरशायर मध्ये एवनमाउथ नजीक एम49 जंक्शन आहे. याची निर्मिती 2019 च्या अखेरीस नॅशनल हायवेजने केली होती. हा महामार्ग ब्रिस्टलनजीक सेवर्न बीच आणि चिटरिंग दरम्यान निर्माण करण्यात आला आहे. परंतु या जंक्शनवरून 3 वर्षांनंतरीही एकही वाहन धावलेले नाही. नॅशनल हायवेजने एम49 जंक्शनला अमेझॉन वेयरहाउससेस, टेस्को, लिडल, नेक्स्ट, डीएचएल आणि द रेंजकडून वापरण्यात येणाऱ्या डिस्ट्रीब्युशन पार्कला जोडण्यासाठी निर्माण करण्यात आले होते.
डिस्ट्रीब्युशन पार्कचे मालक आणि साउथ ग्लॉस्टरशायर कौन्सिल यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादामुळे एम49 जंक्नशला लिंक रोडशिवायच सोडण्यात आले होते. बिझनेस पार्क आणि डेल्टा प्रॉपर्टीजचे मालक एम49 जंक्शनला स्थानिक रस्त्यांशी जोडणारे लिंक रोड तयार करण्यासाठी जबाबदार असल्याचे साउथ ग्लॉस्टरशायर कौन्सिलचे म्हणणे आहे. तर बिझनेस पार्क आणि डेल्टा प्रॉपर्टीजचे मालक हा दावा फेटाळत आहेत. लिंक रोड तयार करण्याची आमचे कुठलेही कायदेशीर उत्तरदायित्व नसल्याचे त्यांचे सांगणे आहे. याच वादामुळे मोटरवे जंक्शन तयार होऊनही तो अद्याप वापरात आणता आलेला नाही. एम 49 जंक्शनला स्थानिक रस्तेजाळ्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे स्थानिक कौन्सिलने सांगितले आहे.
कौन्सिलच्या एका बैठकीत नव्या एम49 जंक्शनला स्थानिक रस्त्यांशी जोडण्यासाठी लिंक रोड तयार करण्याच्या शिफारसीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









