अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराचा प्रताप
निवडणुकीच्या प्रचारसभा यशस्वी ठराव्यात याकरता उमेदवार काहीतरी अनोखे करण्यासाठी धडपडत असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांना हटविण्यासाठी होत असलेल्या ‘रिकॉल’ निवडणुकीसाठी एका रिपब्लिकन उमेदवाराने केलेली प्रचारसभाच व्हायरल झाली आहे. स्वतःच्या या सभेत उद्योजक जॉन कॉक्स एका 500 किलो वजनाच्या अस्वलासह पोहोचले होते.
जॉन कॉक्स यांची ही सभा मंगळवारी सॅक्रामेंटो पार्कमध्ये झाली होती, या सभेत त्यांना स्वतःला ‘बीस्ट’ म्हणून कास्ट केले होते. अस्वल लक्ष वेधून घेणार अशी असलेली अपेक्षा खरी ठरल्याचे जॉन यांनी म्हटले आहे. हे अस्वल अनेक चित्रपट, जाहिराती आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसून आले आहे. याचे नाव टॅग असून ते कोडियॅक अस्वल आहे.









