कराड : प्रतिनिधी
वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील काजू प्रक्रिया उद्योग कंपनीतून सुमारे पन्नास हजार रूपयांचे काजू चोरट्यांनी लंपास केले. ज्ञानदीप शंकर शिंदे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोली निळेश्वर येथे अनुश्री काजू प्रक्रिया उद्योग नावाची कंपनी असून ज्ञानदीप शिंदे हे त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करतात. 16 सप्टेंबर रोजी दिवसभर कंपनीत काजूवर प्रक्रिया केली जात होती. रात्री नेहमीप्रमाणे कंपनी बंद करण्यात आली. त्यानंतर रात्री चोरट्यांनी पॅक्टरीच्या पत्र्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. पॅक्टरीतील 90 किलो काजू आणि हाफ प्रोसेसिंग केलेले 29 किलो काजू असा 48 हजार ऊपये किमतीचा काजू लंपास केला. याबाबत ज्ञानदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार मिलिंद बैले तपास करीत आहेत.