नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदारालाही स्थान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी गुऊवारी राज्यसभेच्या उपसभापतींच्या पॅनेलची पुनर्रचना केली. पुनर्रचित पॅनेलमध्ये 50 टक्के महिला आहेत. सभापती धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सभागृहाला यासंबंधी माहिती दिली. 17 जुलै 2023 रोजी पॅनेलची पुनर्रचना करण्यात आल्याचे सांगत राज्यसभेचे उपसभापती बनलेल्या खासदारांमध्ये पीटी उषा, एस फांगनॉन कोन्याक, फौजिया खान, सुलता देव, व्ही विजयसाई रे•ाr, घन:श्याम तिवारी, एल हनुमंथय्या आणि सुखेंदू शेखर रे यांचा समावेश आहे. पॅनेलमधील पन्नास टक्के सदस्य महिला खासदार आहेत. राज्यसभा सभापती सभागृहातील काही सदस्यांना वेळोवेळी उपसभापती पॅनेलमध्ये नामनिर्देशित करतात. यापैकी कोणताही एकजण सभापतींच्या अनुपस्थितीत किंवा त्यांच्या विनंतीवरून सभागृहाचे कामकाज चालवू शकतो.









