युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला आता 50 दिवस पूर्ण होत असून या कालावधीत युक्रेनमधून 50 लाखांहून अधिक नागरीकांनी पलायन केले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी दिली. या नागरीकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये पायाभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला असून संयुक्त राष्ट्रसंघ या देशांच्या संपर्कात आहे, असे स्पष्ट करण्यात आले. या स्थलांतरासंदर्भात संयुक्त राष्टसंघाने चिंता व्यक्त sकेली. स्थलांतरितांना साहाय्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
युपेनच्या शेजारी हंगेरी, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया आदी देश आहेत. या देशांनी शरणार्थींसाठी आपल्या सीमा उघडल्या होत्या. त्यामुळे युक्रेनमधून या देशांमध्ये स्थलांतरीत होण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्या होत्या. अवैध स्थलांतरही मोठय़ा प्रमाणात झाले असावे असे अनुमान आहे. अनेक देशांनी युद्धाला प्रारंभ होताच आपले नागरीक या देशातून काढून घेतले. या देशांमध्ये भारताचाही समावेश होता. भारताने आपले जवळपास 15 हजार नागरीक पहिल्या पंधरा दिवसांमध्येच परत आणले होते. सध्या युक्रेनमध्ये काही भारतीय आहेत. मात्र ते स्वेच्छेने तेथे राहिल्यामुळे सरकार काही करण्याच्या परिस्थितीत नाही. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आदी देशांनी असेच केले आहे. त्याशिवाय 50 लाख युपेनचे नागरीक स्थलांतरीत झाले आहेत. त्यांना साहाय्याचा हात पुढे करावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले. पलायन केलेल्या नागरीकांचे भवितव्य अंधःकारमय आहे, अशी प्रतिक्रिया युरोपमध्ये उमटत असून युक्रेनच्या सीमारेषेवरील देश चिंतेत आहेत.








