दिल्लीच्या तिहार जेलमधील बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. २०२० मध्ये अर्थात कोरोना काळात दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत तिहारमध्ये विविध पदांवर भरती करण्यात आली होती. बायोमेट्रिक पद्धतीने ही भरती करण्यात आली होती. अवैध पद्धतीने ही भरती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ५० कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. मग सेवा समाप्तीची सूचना म्हणून ३० नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.