लसींच्या उपलब्धतेनुसार तारीख जाहीर केली जाणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या पुढील टप्प्यात 50 वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे. या टप्प्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी संसर्ग वाढत असल्याने लसींच्या उपलब्धतेनुसार लवकरच हा टप्पा सुरू केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 2 कोटी 56 लाख 85 हजार 011 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने जारी केली आहे.देशभरातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याचे दिसत असताना मागच्या महिन्यापासून पुन्हा संसर्ग झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. सरकारने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात सर्व ज्ये,नागरिक तसेच 45 ते 60 या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर लवकरच लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील वयोगटातील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कोणत्या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण कधी करायचे याबाबतचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. या सर्वांचे एकाच टप्प्यात लसीकरण शक्मय नसल्यामुळे सरकारकडून प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.









