संसदीय समिती- चाचणीसाठी 16 प्रस्ताव सादर
नवी दिल्ली
दूरसंचार विभागाकडे 3जी फिल्ड चाचणीसाठी 16 प्रस्ताव दाखल झाले आहेत. आगामी दोन-तीन महिन्यांमध्ये 5-जी तंत्रज्ञानाची चाचणी सुरु होण्याचे संकेत आहेत. दूरसंचार विभागाने संसदेच्या स्थायी समितीला याची माहिती दिली आहे. यासोबतच चाचणीमध्ये स्वदेशी आणि आयात करण्यात आलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
5-जी सेवा सुरु होण्यास का विलंब होतोय याचा प्रस्ताव सादरीकरणानंतर देशामध्ये 5 जी नेटवर्कवर आधारीत सेवा सुरु होण्यास का उशिर होत आहे, अशी विचारणा केल्यानंतर दूरसंचार विभागाने माहिती दिली आहे.
संसदीय समितीने विचारले की, 5 जी चाचणीसाठी आतापर्यंत स्पेक्ट्रमची अनुमती का दिली नाही. दूरसंचार विभागाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की देशात चाचणी सुरु होण्यात कोणतीही अडचण नसून त्यासाठी काही वेळ द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
5-जी सेवेला होणार उशीर
तयारीमध्ये कमी, स्पेक्ट्रमशी संबंधीत प्रकरण, 5-जी सर्व्हिससाठी स्पेक्ट्रमच्या विक्रीसंदर्भात अनिश्चितता व्यक्त केली जाते. यासारख्या समस्यांमुळे देशातील 5-जी सेवेला सुरुवात होण्यास विलंब होण्याची शक्यता संसदीय समितीने व्यक्त केली आहे.
स्पेक्ट्रम लिलाव मार्चमध्ये
दूरसंचार मंत्रालयाच्या माहितीनुसार 1 मार्च 2021 पासून स्पेक्ट्रम लिलावाची घोषणा होणार आहे. यामध्ये 3.92 लाख कोटी रुपयांचा स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे. 5-जी सर्व्हिससाठी अपेक्षित बँडच्या स्पेक्ट्रमचा यात समावेश केलेला नाही. कारण भारतात 4 जी सेवेच्या विस्तारास 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागला होता.









