वर्क फ्रॉम होमनंतर झाली वाढ : लिपस्टिक, आयलायनरला पसंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्क फ्रॉम होमची प्रणाली जवळपास सर्वच कंपन्यांनी थांबवल्याने सौंदर्य उत्पादनांच्या किमती आता वाढल्या असून गेल्या 6 महिन्यात तब्बल 5 हजार कोटी रुपयांची उत्पादने विक्री झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. भारतातील आघाडीवरच्या 10 शहरांमध्ये गेल्या 6 महिन्यात लिपस्टिक, नेल पॉलीश आणि आयलाइनरसह इतर सौंदर्यवर्धक उत्पादने जवळपास 1 कोटीहून अधिक विक्री झाली आहेत. यासंदर्भातली माहिती कांतार वर्ल्डपॅनेल यांच्या अभ्यासातून समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौंदर्य उत्पादनांवर महिलांकडून 5 हजार कोटी 6 महिन्यात खर्च करण्यात आले असून यातील 40 टक्के ऑनलाइन माध्यमातून खरेदी करण्यात आले आहेत. विविध कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही प्रणाली बंद केली असल्याने या क्षेत्रातील महिला पुन्हा आता प्रत्यक्षात नोकरी करु लागल्याने सेंदर्य उत्पादनांची मागणी वाढली आहे. या उत्पादनांमध्ये विक्रीत सर्वाधिक वाटा उचलला आहे 38 टक्के इतका तो लिपसंबंधीत उत्पादनांनी.
काय खपतंय ते पाहुया
? काजल, लिपस्टिकव्यतिरीक्त आता प्रायमर, आय शॅडो व कंन्सीलर यांचा खप अधिक
? लिपस्टिक, नेल पॉलिश अधिक वय झालेले अधिक वापरत आहेत
? सोशल मीडियावरील उत्पादनांचा तरुणींवर अधिक परिणाम
? प्रायमर व टिंटेड लिप बामला तरुणींची अधिक पसंती









