पुणे / प्रतिनिधी :
पुणे महापालिकेअंतर्गत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या 5 जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश परदेशी (वय 40), रोहित परदेशी (25), रोहन परदेशी (25), महेश परदेशी (33) आणि सुरज परदेशी (20) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह प्रतीगणेश परदेशी, शामा सुपरसिंग परदेशी (50) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत प्रल्हाद कोळेकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
16 मे रोजी अतिक्रम विभागाचे अधिकारी सार्वजिनक रस्त्यावरील हात गाडयांवर कारवाई करत होते. कैलास स्मशानभूमी ते आरटीओ कार्यालयादरम्यान कारवाई सुरू असताना या अधिकाऱ्यांना हातगाडीवाल्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, अन्य दोघांवर गुन्हा दाखल आहे. बंडगार्डन पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









