कोल्हापुरातील माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. मंगळवारी कोल्हापुरातील चार माजी नगरसेकांसह पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत हा प्रवेश सोहळा झाला.
माजी नगरसेवक व शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख अमोल माने, माजी नगरसेवक नंदकुमार गुर्जर, माजी नगरसेवक कमलाकर भोपळे, माजी नगरसेवक प्रकाश काटे, माजी नगरसेवक नियाज खान आणि कार्यकर्त्या योगिता कोडोलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.








