वार्ताहर /केपे
केपे तालुक्यातून मंगळवारी दुसऱया दिवशी 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे एकूण 7 अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. सोमवारी फातर्पा पंचायतीतून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते, तर मंगळवारी दोन अर्ज फातर्पा पंचायतीतून सादर करण्यात आले. यामुळे फातर्पा पंचायतीतून एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय कुडचडे मतदारसंघात समावेश होणाऱया शेल्डे पंचायतीतून दोन अर्ज, तर असोल्डा पंचायतीतून एक अर्ज दाखल झाला आहे.









