बेटावर युक्रेनियन नागरिकांचा होतोय छळ
युक्रेनवर ब्लादिमीर पुतीन यांची क्रूर कारवाई सुरूच आहे. पुतीन यांनी सुमारे 5 लाख युक्रेनियन नागरिकांना रशियाच्या एका दुर्गम भागात कैद करून ठेवल्याचे वृत्त आहे. पुतीन हे युद्धग्रस्त देशावर स्वतःचे नियंत्रण आणू इच्छित आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात युक्रेनचे स्थायी प्रतिनिधी सर्गी किस्लित्सिया यांनी 5 लाख नागरिकांना बळजबरीने रशियान पाठविले असल्याचे सांगत यात 1 लाख 12 हजार मुलांचा समावेश असल्याचा दावा केला आहे.
रशियाच्या दुर्गम क्षेत्रातील सखालिन बेटावर युक्रेनच्या नागरिकांना पाठविण्यात आले आहे. हे बेट स्वतःची क्रूर शतकं आणि संकटमय भागांसाठी ओळखले जाते. या बेटावर कैद करण्यात आल्यावर युक्रेनच्या नागरिकांना काही दस्तऐवज देण्यात आले असून यात दोन वर्षांपासून येथून बाहेर पडता येणार नसल्याचे नमूद आहे. सखालिन हे रशियातील सर्वात मोठे बेट असून याची लोकसंख्या 1 लाख 27 हजार इतकी आहे. यातील अनेक लोक मस्त्यपालन किंवा ऊर्जानिर्मिती क्षेत्रात काम करतात.
रशियात सर्वात थंड भाग
बेटाची लोकसंख्या अत्यंत सैन्यवादी असून त्यांना रशियाच्या सैन्याच्या इतिहासाबद्दल गर्व आहे. दुसऱया महायुद्धादरम्यान या बेटावर रशियाचा कब्जा झाला होता. 1945 मध्ये हे बेट जपानच्या नियंत्रणाखाली होते आणि याचमुळे येथे अनेक जुन्या जपानी इमारती दिसून येतात. हे बेट अत्यंत कुख्यात असून रशियातील सर्वात थंड भागांपैकी एक आहे.
रशियाच्या नागरिकत्वाची सक्ती
युक्रेनच्या नागरिकांना बेटावर कामासाठी जुंपले जाऊ शकते तसेच त्यांच्यावर रशियाचे नागरिकत्व स्वीकारण्याची सक्ती केली जाऊ शकते. युक्रेनियन असण्याचा विचार संपुष्टात आणण्याचा विचार पुतीन यांचा आहे.









