वृत्तसंस्था/अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात रविवारी एका दांपत्य आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह त्यांच्या घरातून हस्तगत झाले आहेत. हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा संशय पोलिसांना आहे. सामूहिक आत्महत्येची ही घटना बागोदरा गावात घडली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती रात्री उशिरा दोन वाजता मिळाली होती. या परिवाराच्या सदस्यांनी विषप्राशन करत आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचे अहमदाबाद (ग्रामीण)चे पोलीस अधीक्षक ओमप्रकाश जाट यांनी सांगितले आहे.
एक पुरुष, त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांनी बगोदरा येथील स्वत:च्या भाड्याने राहत असलेल्या घरात विष प्राशन करत स्वत:चे आयुष्य संपविले आहे. संबंधित पुरुष हा ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. तर परिवाराकडून उचलण्यात आलेल्या या टोकाच्या पावलामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मृतांमध्ये विपुल वाघेला (32 वर्षे), त्याची पत्नी सोनल (26 वर्षे) आणि त्यांची मुलं करिना (11 वर्षे), मयूर (8 वर्षे) आणि राजकुमारी (5 वर्षे) असा समावेश आहे.









