तेहरान
इराणमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केल इतकी होती असे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के उत्तर आणि मध्य इराणमध्ये जाणवले आहेत अशी माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसायन्सेसने दिली आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवित किंवा आर्थिक हानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु भूकंपामुळे अनेक लोक दहशतीत आहेत. चीनमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.









