Buldhana Accident On Sharad Pawar : बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जण बचावले आहेत. या बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी असल्याची माहिती आहे. या अपघाताच्या भीषणतेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तर अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, बुलढाणा अपघातानंतर शरद पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बुलढाणा अपघाताची दुर्घटना दुर्देवी आहे. महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. 5 लाखांची मदत करून प्रश्न सुटनार नाही.अपघात रोखण्यासाठी उपायोजना करा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने विशेष पथक नियुक्ती करुन ‘समृध्दी’ चा आढावा घ्यावा. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतील तर या अपघातांची चौकशी करणे गरजेचे आहे.जागतिक स्थरावरील तज्ञांची समिती गठित करायला हवी.तसेच वारंवार होणारे अपघात आणि अपघातात जाणारे जीव आपल्याला परवडणार नाही.त्यामुळे सरकारने याकडं लक्ष द्यावं, असेही शरद पवार यांनी म्हटलयं.









