बेगूसराय :
बिहारच्या बेगूसरायमध्ये मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. येथे एक रिक्षा आणि कारची समोरासमोर टक्कर झाली. या दुर्घटनेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कारचालक जखमी झाला आहे. दुर्घटनेपूर्वी दोन्ही वाहने वेगात होती असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.









