जम्मू-काश्मीर प्रशासनाची कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरचे जनसंपर्क अधिकारी फहीम असलम, महसूल विभागाचे अधिकारी मुरवत हुसैन मीर आणि पोलीस कॉन्स्टेबल अर्शिद अहमद ठोकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या या शासकीय कर्मचाऱ्यांवर आता युएपीए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. हे कर्मचारी दहशतवाद फैलावण्यासाठी आणि कारवायांसाठी निधी जमा करत होते. तसेच हे कर्मचारी लोकांना देशाविरोधात भडकविण्याचे काम करत होते असा आरोप आहे.









