Bengaluru: कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला.आणि आज सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.या शपथविधीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. कर्नाटकच्या निवडणुकीपूर्वी पक्षाने दिलेली पाच आश्वासने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही तासांत लागू केले जातील, असे आश्वासनही यावेळी जनतेला दिले. एवढेच नाही तर भाजपवर टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपचा द्वेष आणि भ्रष्टाचाराचा पराभव केला.आम्ही खोटी आश्वासने देत नाही.आम्ही जे बोलतो ते करतो.नवीन सरकारची पहिली कॅबिनेट बैठक एक ते दोन तासांत होईल. त्या बैठकीत पाचही ‘हमी’ कायदा मंजूर केले जातील. निकालानंतर राजकीय विश्लेषकांनी सांगितले की,प्रचारादरम्यान ‘गॅरेंटी’चे आश्वासन लोकांना,विशेषत:महिलांना आकर्षित केले गेले आणि यामुळेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शानदार विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, भाजपकडे सत्ता , पैसा , पॉवर, पोलीस होते. तरीही ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. याउलट काँग्रेसकडे “सत्य आणि गरीब लोकांचा पाठींबा” होता म्हणूनच काँग्रेसने निवडणूक जिंकली.जनतेने निवडणुकीत भाजपचा, त्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि द्वेषाचा पराभव केला. आम्ही आमच्या पदयात्रेत म्हटल्याप्रमाणे, प्रेम जिंकले आणि द्वेष हरला. यावेळी कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला मनापासून पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले.
गेल्या पाच वर्षात तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला ते आम्हाला समजले आहे.काँग्रेसने निवडणूक का जिंकली याबद्दल मीडियाने लिहिले. विविध विश्लेषणे आणि विविध सिद्धांत मांडले गेले.मात्र, काँग्रेस गरीब,दुर्बल घटक आणि मागासलेल्यांच्या पाठीशी उभी राहिली हेच विजयाचे कारण होते.समुदाय,दलित आणि आदिवासी यांच्या पाठीशी नेहमीच काँग्रेस उभी राहणार असेही राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून पाच आश्वासने दिली ती कोणती
1)गृह ज्योती -सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज
2)गृह लक्ष्मी- प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला 2,000 रू मासिक मदत
3)अण्णा भाग्य- बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत
4)युवानिधी- बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांसाठी 1,500 रुपये (दोघेही 18-25 वयोगटातील) दोन वर्षांसाठी
5)शक्ती योजना- सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









