आमदार बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ वाठार किरोली
कोरोना कालावधीनंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने वाठार किरोली (ता.कोरेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारित इमारतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसुविधासाठी या ठिकाणी अध्यायवत इमारत उभी करण्यात यावी, जिल्हा परिषद गटातील गावासाठी सुसज्ज प्राथमिक केंद्र उभे राहावे, नागरिकांना 24 तास चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सोयी मिळाव्यात, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी माऊली उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली व तेथील सुसज्ज प्रकारचे काम पाहून त्यांचे कौतुक केले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील, विठ्ठलराव घोरपडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, व्यंकटराव नलवडे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील(बाबा), वसंतराव कणसे, आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील(दादा), दिलीपराव कदम, भागवत घाडगे, किरण जाधव, विष्णूपंत कणसे, पांडुरंग बुवा गायकवाड, काकासो जगताप, तानाजीराव जाधव, विद्याधर बाजारे, श्रीरंग रेवते, योगेश जाधव, राहुल निकम, विलास भोसले, प्रशांत घाडगे, सुरेश उबाळे, पांडुरंग पवार, सतीश गायकवाड, भरत कदम, सतीश भोसले, जयहनुमान घाडगे, दिलीप मोरे, सुरेश उबाळे, संभाजीराव गायकवाड, जोतीर्लिंग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, भरत गायकवाड, काकासो गायकवाड, चेअरमन संजय गायकवाड, माजी सरपंच सविता गुजले, माजी उपसरपंच पोपटराव गायकवाड, मुरलीधर गायकवाड, शंकर खामकर, संजय धोंडी गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, दत्तात्रय शिंदे, रमेश पवार, दत्तात्रय पाटील, दिनकर माळी, विजय लोहार, रामदास गुजले, मोहन जाधव, बाळासो पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता एम.आर.पाटील, शाखा अभियंता टिकोळे, वाठार प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ.जमादार तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबरोबरच अनेक विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. परंतु त्याचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेत आहेत या जिल्हा परिषद गटात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोटय़ावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यांच्या पाठीशी सर्व सामान्य जनता ताकदीने उभी राहील अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन सोमनाथ गायकवाड, आभार पोपटराव गायकवाड यांनी मानले. यावेळी वाठार परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
यावेळी कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भरतराव गायकवाड, माऊली उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दादासो गायकवाड, डॉ. विजय गायकवाड, रणजित पवार, दिलीप गायकवाड, विलासराव घाडगे, संजय वामन गायकवाड, अनिल गायकवाड, प्रकाश भंडलकर, प्रकाश गायकवाड, यांच्यासहित अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.









