वृत्तसंस्था / बेंगळूर
बेंगळूरमध्ये ईडीने जुगार आणि बेटींग अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 5 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बेंगळूर पोलिसांनी केलेल्या तक्रारीनुसार या धाडी टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शनिवारी सकाळपासून धाडसत्राचा प्रारंभ करण्यात आला होता. बुकी आणि दलालांची बँक खाती जप्त करण्यात आली असून या खात्यांवरील 5.87 कोटी रुपयांवर टाच आणण्यात आली आहे. जुगार आणि बेटिंगसाठी ही रक्कम विविध अॅप्सचा उपयोग करुन जमा करण्यात आली होती. ही अॅप्सही आता सील करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या खरेदी करण्यात आलेली अनेक सीमकार्डेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती देण्यात आली.









