तुम्ही एक बेड खरेदी करण्यासाठी 6,60,000 डॉलर्स (5 कोटी रुपये) खर्च करण्यास तयार आहात का? एवढ्या रकमेत एक आलिशान घर खरेदी करता येईल, असे तुम्ही सांगाल. परंतु जगातील अनेक लोक हा बेड खरेदी करण्यास इच्छुक आहेत. स्वीडिश बेड प्रॉड्युसर-सेलर हेस्टेंसने हँडक्राफ्टेट बेड सादर केले आहेत. या बेडला कंपनी ‘स्लीप इन्स्ट्रुमेंट’ ठरवत आहे.
बेयॉन्से, ब्रॅड पिट, टॉम क्रूज आणि एंजेलिना जोली या प्रसिद्ध कलाकारांकडे हा अत्यंत महागडा बेड असल्याचे सांगण्यात येत आहे.
खास चेकर पॅटर्न असलेल्या या बेडच्या वेगवेगळ्या पॅटर्नची किंमत 2 कोटी रुपयांपासून सुरू होते. या बेडमध्ये हॉर्सटेलचे केस वापरण्यात आले आहेत. या बेडचे डिझाइन हेस्टेंसकडून करण्यात आले आहे. ही कंपनी 1852 मध्ये स्वीडनच्या वास्टमॅनलँडमध्ये स्थापन करण्यात आली होती. कंपनी या पलंगाची 25 वर्षे वॉरंटी देखील देत आहे.
खरेदीपूर्वी ट्रायल
अत्यंत मोठ्या गुंतवणुकीसह हा बेड खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकाला उत्पादनाची पूर्ण खात्री पटावी, म्हणून हेस्टेंस कंपनी ट्रायल ऑफर करत आहे. ज्या बेडवर तुम्ही आयुष्यभर झोपाल, त्याचे परीक्षण अत्यंत आवश्यक आहे असे या कंपनीचे म्हणणे आहे.
स्लीप स्पा वैशिष्ट्या
हेस्टेंसचे सर्वात खास आणि मुख्य ‘स्लीप स्पा’ वैशिष्ट्या यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे या बेडच्या वापराचा अनुभव अत्यंत वेगळाच असतो. पूर्ण अमेरिकेत असलेल्या पार्टनर स्टोअरकडून लोकांना या बेडची टेस्ट स्लीप देण्यात येते. हा बेड अत्यंत सुविधाजनक आहे. ग्राहकांना ‘डार्क, लॅवेंडर-सुगंधित शोरुम’मध्ये नेण्यात येते. बेडवर बसण्यापूर्वी ग्राहकांना ‘हॅलो’ उच्चारण्याची सूचना करण्यात येते. यानंतर या बेडचा अत्यंत आरामदायी अनुभव घेता येतो.
बेडची देखभाल
हा बेड खरेदी केल्यावर याची विशेष देखभाल करणे देखील आवश्यक आहे. स्वत:च्या बेडला उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी काही काळानंतर 180 अंशापर्यंत वळविण्याची गरज असते. जेणेकरून स्लीप सरफेस तुमचे शरीर आणि झोपण्याच्या स्थितीच्या अनुकूल असेल. लंडनमध्ये द लँगहममध्ये द इन्फिनिटी सुइट असून तो हस्टेंसच्या 2000टी बेडने सजविण्यात आला आहे, हा बेड 200 किलाग्र्रॅमपेक्षा अधिक वजनाच्या गोष्टींनी तयार करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी तीन वेगवेगळ्या हेस्टेंस बेडपैकी एकाची निवड ग्राहक करू शकतात. या सुइटची किंमत प्रतिरात्र 8 लाख रुपये इतकी आहे. या बेडवर झोपण्याची चैन केवळ धनाढ्यांना परवडू शकते.









