ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
वृत्तसंस्था /चंदीगड
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पंजाबमधून 30 किलो हेरॉईनसह एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे पाच कोटी ऊपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. अमली पदार्थांची ही खेप पाकिस्तानातून पंजाबमध्ये पाठवण्यात आली होती, असा पोलिसांचा दावा आहे. काश्मीरमध्ये एका अमली पदार्थ तस्कराला अटक केल्यानंतर या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. काश्मीरमधील कुपवाडा येथून पंजाबकडे जाणाऱ्या इनोव्हामधून पोलिसांनी 30 किलो ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर या प्रकरणातील सर्व लिंक तपासण्यात आल्या. त्याचा सुगावा कुपवाडा जिह्यात सापडला. कुपवाडामधून अमली पदार्थांची ही खेप पंजाबच्या अमली पदार्थ विव्रेत्याकडे सुपूर्द करण्यात येणार होती. याप्रकरणी पोलिसांनी कुपवाडा येथून 4 जणांना अटकही केली आहे.









