पाकिस्तानात दिसून आला प्रभाव
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तान बुधवारी पहाटे 5.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा प्रभाव भारतातील काही ठिकाणी दिसून आला आहे. परंतु याचा सर्वाधिक प्रभाव पाकिस्तान आणि तजाकिस्तानात राहिला. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश क्षेत्रात 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात जमिनीत 75 किलोमीटर खोलवर होते. 5.9 तीव्रतेचा भूकंप गंभीर नुकसान पोहोचवू शकतो असे मानले जाते, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त समोर आलेले नाही.
यापूर्वी म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी मोठा भूकंप झाला होता. तर 14 एप्रिल रोजी देखील म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता, त्याची तीव्रता 4.0 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 103 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपाचा प्रभाव भारताच्या ईशान्येतील राज्यांमध्ये जाणवला होता. मणिपूरमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. तर त्यापूर्वी रविवारी म्यानमारमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचे केंद्र 10 किलोमीटर खोलवर जमिनीत होते.









