तेहरान
इराणमध्ये शनिवारी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, किशच्या ईशान्येला 30 कि.मी. अंतरावर भूकंप झाला. त्याचे केंद्र सुरुवातीला 26.7253 अंश उत्तर अक्षांश आणि 54.2613 अंश पूर्व रेखांशावर 10 कि.मी. खोलीसह निर्धारित केले गेले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात हजारहून अधिक बळी गेल्याने सध्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत लोकांमध्ये भीती आहे.