2 वर्षे वायपासून आईचा करतेय मेकअप
छोटी मुले जेव्हा स्वतःच्या आईला नटताना पाहतात, तेव्हा त्यांनाही मेकअप करावा असे वाटते. लिपस्टिक लावावी, पावडर लावावी का अन्य मेकअप करावा असे त्यांना वाटत असते. परंतु तुम्ही कधी कुठल्या छोटय़ा मुलाला स्वतःच्या आईचा मेकअप करताना पाहिले आहे का? इंग्लंडमधील एक मुलगी मेकअप करण्यात इतकी तरबेज आहे की ती स्वतःच्या आईचा मेकअप करते आणि तिचे वय केवळ 5 वर्षे आहे.
लंडनमध्ये राहणारी शॅब सोशल मीडियावर जितकी स्वतःमुळे लोकप्रिय आहे, त्याहून अधिक स्वतःची 5 वर्षीय मुलगी केसीमुळे प्रसिद्ध आहे. केसी स्वतःच्या मेकअप कौशल्यामुळे चर्चेत राहते. ती स्वतःच्या आईचा असा मेकअप करते की पाहणारा दंग होऊन जातो. अलिकडेच शॅबने एक व्हिडिओ शेअर केला असून तो अत्यंत गोड वाटावा असा आहे. वयाच्या 2 वर्षांपासूनच केसीला फॅशन आणि मेकअपमध्ये स्वारस्य होते असे शॅब यांनी म्हटले आहे.

मेकअप किटशी खेळू शकते असे केसी विचारायची असे शॅब यांनी सांगितले. 2018 सालच्या छायाचित्रात केसी स्वतःच्या आईच्या लिपस्टिकशी खेळताना दिसून येते. तर 2022 मध्ये ती आईचा मेकअप करताना दिसून येत आहे. स्वतःच्या आईच्या डोळय़ांनजीक टेप चिकटवून तिच्या डोळय़ांचा मेकअप ती करते.
शॅबची मुलगी अत्यंत प्रतिभावान असल्याचे सोशल मीडियावर एका महिलेने नमूद केले आहे. सर्वजण केसीच्या गुणवत्तेचे कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये मायलेकी एकत्र पोझ देताना दिसून येतात. केसीचे स्वतःचे इन्स्टाग्राम अकौंट देखील आहे. या अकौंटवर 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर आईच्या अकौंटवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.









