ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बँकांमधील एक लाखांच्या ठेवींऐवजी आता 5 लाखांपर्यंतच्या ठेवींवर विमा सुरक्षा कवच मिळणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी सीतारामन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, बँकिंग क्षेत्रासाठी 3 लाख 50 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बँकांची स्थिती सुधारण्यास केंद्र सरकारला यश आले असून, दिवाळखोरीतून काही बँकांना बाहेर काढणे हा या अर्थसंकल्पाचा हेतू आहे.
नॉन गॅझेटेड पोस्टसाठी नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सीची निर्मिती करण्यात येणार आहे. जी 20 परिषदेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येणार असून, भारतात या परिषदेचे आयोजन करण्यात येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
एलआयसीमधील भागीदारी विकण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. तसेच आयडीबीआय बँकेतील हिस्साही सरकार विकणार आहे.









