तालिबानसमोर 3 लाख सैनिकांनी शस्त्र खाली ठेवले. पण काही महिलांना तालिबानची राजवट मान्य नाही. अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाच्या तिसऱयाच दिवशी काबूलमध्ये 5 महिला निदर्शने करताना दिसून आल्या. या महिलांसमोर दहशतवादी उभे होते, हे दहशतवादी या महिलांना घरी परतण्यास सांगत होते. पण या महिलांनी धमक्यांना भीक न घालता तालिबान विरोधात निदर्शने केली आहेत. 20 वर्षांपासून प्राप्त असलेले अधिकार आम्हाला हवे आहेत. राजकारणात भागीदारी आमचा हक्क आहे. सामाजिक कार्याचा अधिकार मिळावा असे या महिलांनी म्हटले आहे.
दुर्लक्ष करता येणार नाही
वर्तमान घटनेनुसार अफगाणिस्तानच्या महिलांना मूलभूत अधिकार दिले जावेत. अफगाणिस्तान महिलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अफगाणी महिलांचा आवाज कुठलीच सत्ता दडपू शकत नाही. 20 वर्षांमध्ये अफगाणी महिलांनी केलेली कामगिरी विसरली जाऊ नये. आम्ही लढत राहू असे एका महिलेने म्हटले आहे.









