वर्क फ्रॉम होमसह ओटीटी, व्हीडीओ प्लॅटफॉर्मच्या वापराचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमचा प्रारंभ तसेच व्हीडीओसह अन्य कामासाठी इंटरनेटचा वापर वेगाने वाढत गेल्याच्या कारणामुळे मार्च ते जुलैपर्यंत जवळपास 947 टक्क्मयांहून अधिक डाटा विक्री देशात झाल्याची माहिती आहे.
मुख्य स्वरुपात ओटीटी आणि व्हीडीओ पाहणे तसेच सध्याच्या घरातून काम करण्याच्या प्रक्रियेसाठी इंटरनेटचा वापर अधिक करण्यात आल्याने डाटा वापरात वाढ झाली आहे. फ्रँकफर्टच्या इंटरनेट एक्सचेंजनुसार फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत मार्च आणि एप्रिलमध्ये ओटीटी आणि व्हीडीओ म्हणजेच व्हीओडी प्लॅटफॉर्मवर डाटाची विक्री 249 टक्क्मयांनी वधारत जात मार्च ते जुलै 18 पर्यंत डाटा विक्री 947 टक्क्मयांपेक्षा अधिक राहिल्याची नोंद करण्यात आली.
आगामी काळातही तेजीचे संकेत
सदरची स्थिती आणि कोविडचा प्रभाव पाहता डाटा विक्रीचा आलेख येत्या नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याचे संकेत आहेत. तर नोकियाच्या वार्षिक मोबाईल ब्रॉडब्रँड इंडिया ट्रफिकच्या अहवालाच्या अंदाजानुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्राहक 70 मिनिट प्रति दिवस खर्च करत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच डाटा वापर आणखी वाढणार आहे.
ऍरिक्सनचे भाकीत
भारतात प्रति व्यक्ति महिन्याच्या आधारे डाटा वापर येत्या 2025 पर्यंत 25 जीबीपर्यंत पोहोचणार असल्याचे संकेत दूरसंचार उपकरणे निर्मिती करणारी कंपनी ऍरिक्सनने आपल्या अहवालात दिले आहेत.









