एरिक्सन रिसर्चमधून माहिती : 2030 पर्यंत टप्पा गाठणार, महसुलातून कमाई वाढणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या जगातील 4-जी नेटवर्क सुविधा वापरण्याचे प्रमाण विविध देशांमध्ये मागे पडू लागले आहे. याचाच सकारात्मक लाभ म्हणून 5-जी कंझ्युमर मार्केट नवी उंची प्राप्त करण्याचे संकेत व्यक्त होत आहेत. यामध्ये येत्या 2030 पर्यंत जगातील 5 जी कंझ्युमर मार्केट 31 लाख कोटी डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचे संकेत आहेत. यामध्ये कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे सीएसपीचे उत्पन्न 3.7 लाख कोटी डॉलर्सपर्यंत जाण्याची माहिती एरिक्सनच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
आगामी एक दशकात फक्त डिजिटल सर्व्हिस महसूलातून सीएसपी कंपन्यांची कमाई 131 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. साधारणपणे या कंपन्यांच्या एकूण उत्पन्नात जवळपास 40 टक्के हिस्सा हा 5 जी ग्राहकांवर अवलंबून असणार आहे. यामध्ये व्हिडीओ, ऑगमेंट रियल्टी (एआर), व्हर्चुअल रियल्टी (व्हीआर) आणि क्लाउड गेमिंगवर किती खर्च होणार यावरही ही बाब निश्चित होणार आहे. याच दरम्यान ऑगमेंट रियल्टी निम्म्याहून अधिक ग्राहकांचा खर्च संचलीत करणार आहे. यामध्ये गेमिंग, शॉपिंग, शिक्षण आणि अन्य मोठय़ा घटकांचा समावेश राहणार आहे.
5जीच्या ग्लोबल मार्केटचा विस्तार
एरिक्सनच्या अहवालानुसार सीएसपी कंपन्यांना प्रति ग्राहकांकडून होणाऱया कमाईत 34 टक्क्यांनी वाढ होण्याचे संकेत आहेत. तसेच ग्रँड न्यू रिसर्चनुसार 2020 पर्यंत 5 जी सर्व्हिसचा ग्लोबल मार्केटचा आकार 41.48 अब्ज डॉलर्सचा होण्याचा अंदाज असून येत्या 2021-27 या कालावधीत हा आकार 43.9 टक्क्यांनी वाढण्याची माहिती आहे.
भारतात 5 जी चाचणी भारतामध्येही 5 जी नेटवर्कची चाचणी लवकर घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. याच्यासाठी विदेशी कंपन्यांसोबत देशातील रिलायन्स जिओचेही काम वेगाने सुरु आहे. मागील महिन्यात मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार ए सर्कल आणि मेट्रो शहरांसाठी 78,800 कोटी रुपयांपासून 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत खर्च येण्याचा अंदाज आहे. यामध्ये केवळ मुंबईमध्ये 5 जी साठी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज भासणार आहे.