नवी दिल्ली : भारतामधील दूरसंचार कंपन्या 5 जी नेटवर्कची सेवा देण्यासाठीचे पाऊल सध्या उचलण्यासाठी पुढे येत असल्याचे पहावायस मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्याकडून देशात 5 जीच्या पडताळणीसाठीच्या आवश्यक उपकरणांची खरेदी करण्यासाठी आपल्या पसंतीदारांसोबत करार करत असल्याची माहिती टेलिकम्युनिकेशन (डीओटी) यांच्याकडे देण्यात आली आहे. एका मीडिया अहवालानुसार भारतात व्यवसाय करत असणाऱया दूरसंचार कंपन्यांनी 5 जी नेटवर्कसाठी उपकरणे वापरण्यात चिनी कंपनी हुआई आणि जेडटीईपासून लांब जात असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे सर्व कंपन्या युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांसोबत करार करत असल्याची माहिती असून लवकरच सरकार सदर नेटवर्कची चाचणीच्या तारखा निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
खालील कंपन्यांची भागिदारीसोबत होणार 5-जी चाचणी
दूरसंचार कंपनी : रिलायन्स जिओ
भागिदारी : सॅमसंग, नोकिया आणि ऍरिक्सन
दूरसंचार कंपनी : भारती एअरटेल
भागिदारी : नोकिया, ऍरिक्सन
दूरसंचार कंपनी : क्होडाफोन आयडिया
भागिदारी : नोकिया, ऍरिक्सन आणि मेवनीर
दूरसंचार कंपनी : बीएसएनएल
भागिदारी : सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (सीडीओटी)