ऍरिक्सनच्या अहवालात अनुमान : जगभरात 5-जीचा विस्तार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरात वर्ष 2026 पर्यंत 5-जी नेटवर्कचा जोरदार प्रसार होणार असून भारतामध्ये 5 जी जोडण्यांची संख्या 35 कोटीच्या घरात राहणार असल्याची माहिती प्रमुख दूरसंचार कंपनी ऍरिक्सनच्या अहवालातून देण्यात आली आहे. स्पेक्ट्रम लिलाव पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार असून भारताला त्याचे पहिले 5-जी कनेक्शन 2021 मध्ये मिळण्याचे संकेत आहेत. ऍरिक्सनचे दक्षिण पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत येथील प्रमुख नितीन बंसल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
ऍरिक्सन मोबिलिटी अहवाल-2020 नुसार जगभरामध्ये एक अब्ज लोक जे जागतिक लोकसंख्येच्या 15 टक्के आहेत, ते 5-जी कव्हरेजपर्यंत पोहोचलेले आहेत. 2026 पर्यंत जगातील 60 टक्के लोकसंख्या 5-जीच्या संपर्कात येणार आहे.
मोबाईल ग्राहकांची संख्याही वधारणार
भारतात ज्या प्रमाणात 5-जी ग्राहकांची संख्या वाढणार आहे. त्या प्रमाणात मोबाईलची एकूण ग्राहकांची हिस्सेदारी ही 27 टक्क्यांवर पोहोचणार असून यामध्ये स्मार्टफोन वारणाऱयांच्या संख्येतही वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.









