पाकिस्तानात मिळालेल्या अवशेषातून झाली पुष्टी
जगातील सर्वात मोठा मासा व्हेल 5 कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर 4 पायांवर चालत होता. पाकिस्तानात मिळालेले अवशेष याची पुष्टी देतात असा खुलासा अमेरिकेच्या नॉर्थइस्ट ओहियो मेडिकल युनिव्हर्सिटीने संशोधनात केल आहे. कोटय़वधी वर्षापूर्वी छोटय़ा हिरणांच्या वंशजांमधूनच व्हेल माशाचा विकास झाला. वैज्ञानिक भाषेत या प्राण्याल इंडोहायस म्हटले जाते.
असा झाला व्हेल

छोटय़ा हरिणी अन्नाच्या शोधात आणि स्वतःची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पाणघोडय़ाप्रमाणे पोहायच्या. कालौघात त्या पूर्णपणे जलचरात रुपांतरित झाल्या. त्यांचे पाय माशांच्या फिनमध्ये बदलले. व्हेल सस्तनधारी जीवातून विकसित झाल्याचे डार्विनच्या काळापासूनच म्हटले जात आहे. पण हे नेहमीच एक रहस्य राहिले आहे. याचा सस्तनधारी जीवाशी कुठले कनेक्शन हे आता समोर आले आहे. पाकिस्तानात मिळालेल्या अवशेषात याची पुष्टी झाली आहे. अवशेषात कोल्हय़ाच्या आकारातील सांगाडा मिळाला असून याचे अध्ययन केल्यावर कवटी आणि कानाचा हिस्सा हिरण आणि व्हेलशी मिळतेजुळते असल्याचे आढळून आले.
पाण्यातून शिकार
इंडोहायस पाण्यात रहायचा, याची पुष्टी त्याच्या दातांमध्ये मिळालेल्या रसायनातून होते. दातांमध्ये मिळालेल्या ऑक्सिजन आणि कार्बन आयसोटोपची पातळी पाहता हा प्राणी पाण्यात राहत होता. ही हिरण पाण्यात अनेक तास बसून राहत होती आणि शिकार तेथे येण्याची प्रतीक्षा करायची. याचे शरीर कोल्हय़ाप्रमाणे होते आणि एक शेपूटही होते. याची हाडे व्हेलशी मिळतीजुळती असल्याचे उद्गार वैज्ञानिक थिविसेन यांनी काढले आहेत.









