अभिनेत्री परिणीति चोप्राचा खुलासा
अभिनेत्री परिणीति चोप्रा मागील 5 वर्षांमधील स्वतःच्या कामावर अत्यंत नाराज आहे. एका खराब चित्रपटाचा हिस्सा असल्याचे अनेकदा मला माहित असायचे असे तिने म्हटले आहे. मी नेहमीच तीन दिग्दर्शकांची आभारी राहणार असल्याचे तिने नमूद केले आहे.
मागील 5 वर्षांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये केलेल्या कामाबद्दल मी आनंदी नव्हते. मला स्वतःवर विश्वास होता, पण निर्माते मला हवी तशी भूमिका देत नव्हते. माझ्या मनाची तयारी नसताना मी चित्रपट स्वीकारत होते. अमोल गुप्ते (साइना). दिवाकर बॅनर्जी (संदीप और पिंकी फरार) आणि रिभु दासगुप्ता (द गर्ल ऑन द ट्रेन) या तीन दिग्दर्शकांची मी नेहमीच आभारी राहणार असल्याचे परिणीतिने सांगितले आहे.
परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेज रिकी बहल’ चित्रपटात सहाय्यक भूमिका करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘इश्कजादे’, शुद्ध देसी रोमांस’, ‘हंसी तो फंसी’ आणि ‘गोलमान अगेन’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रणवीर कपूरसोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ऍनिमल’ या चित्रपटातून ती झळकणार आहे.









