नवी दिल्ली
सरकार 5जी परीक्षणासाठीचा प्लॅटफॉर्म (टेस्टबेड) जानेवारीत सुरु करणार असल्याची योजना आखत आहे. यामध्ये लघु व मध्यम तसेच उद्योगाशी संबंधीत अन्य कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर आपापले परीक्षण कंपन्या करणार असल्याची माहिती आहे.
आम्ही अडचणीच्या कालावधीतही 5 जी परीक्षणासह अन्य प्लॅटफॉर्म स्थापन करण्याचा प्रयोग केला आहे. यामुळे आम्हाला विश्वास आहे, की जानेवारीत 5 जी परीक्षण प्लॅटफॉर्म कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचेही दूरसंचार विभागाचे सचिव राजारमण यांनी इंडिया मोबाईल क्राँगेस या कार्यक्रमात सांगितले आहे.
यामध्ये आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी बॉम्बे, आयआयटी कानपूर, बेंगळूरमधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स आदि संस्थांचा समावेश होणार असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले.









