मुंबई :
विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये खरेदीचा सिलसिला कायम ठेवला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 4800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे.
आगामी काळामध्ये अमेरिकेत व्याजदरामध्ये कपातीचे संकेत व्यक्त केले जात असून या अंतर्गत विदेशी गुंतवणूकदारांचा कल हा भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीत अधिक दिसून येईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. 5 जानेवारीपर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 4773 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात केली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 66,134 कोटी रुपयांची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे.









