केळबाईवाडा मये येथे विविध संघटनांची जाहीर सभा. मये गावातील लोकांची मोठी उपस्थिती. मंगळवारी संध्या. 5 नंतर घेणार निर्णय. रेड्यांच्या जत्रेपूर्वी मंदिर उघडावे.
डिचोली : केळबाईवाडा मये येथील देवी केळबाईचे गेले पंधरा दिवस बंद असलेले मंदिर येत्या 48 तासांच्या आत खुले करावे. बुध. दि. 12 एप्रिल रोजी मयेतील प्रसिद्ध रेड्याची जत्रा असल्याने हे मंदिर खुले करावे, अन्यथा जत्रोत्सव होऊ शकणार नाही. जर या मागणीकडे मामलेदार किंवा प्रशासनाने दुर्लक्ष केले तर पुढील घडणाऱ्या प्रकारांना पूर्णपणे प्रशासन व सरकार जबाबदार राहिल. त्यासाठी मंगळ. दि. 11 एप्रिल रोजी संध्या. 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. केळबाईवाडा मये येथे मंदिराच्या सभामंडपात विविध संघटनांमार्फत आयोजित जाहीर सभेत सदर निर्णय घेण्यात आला. यावेळी परशुराम सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर, बजरंग दलाचे हनुमंत च्यारी, भारत माता की जयचे गणेश गावडे, हरी राम नाईक, हरिश्चंद्र च्यारी, महादेव आरोंदेकर, संजय आरोंदेकर, नितीन गा•ाr, सत्यवान गावस, भानुदास गोसावी, शिवा नाईक व इतरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर या सभेला गावातील नागरिक व इतर संघटना सुमारे 400 लोक उपस्थित होते. उत्सवाच्या दिवशीच मयेतील देवी केळबाईचे मंदिर कुलूपबंद करण्याचा दुर्दैवी प्रकार या देवस्थान समितीने केलेला असून हा प्रकार निंदनीय आहे. मामलेदारांनी दिलेली नोटीस धुडकावून लावताना समितीने आपणच या देवस्थ नचे सर्वस्व असल्याच भास निर्माण करून मंदिर बंद करण्याचा घ्रुणास्पद प्रकार केलेला आहे. याकडे आता मामलेदारांनी गांभिर्याने लक्ष घालून मंदिर बुधवारच्या जत्रोत्सवापूर्वी खुले करावे. अन्यथा 48 तासांनंतर सर्व ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटना पुढचा निर्णय घेणार, असे परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले. मयेतील देवीचे मुख्य मंदिर बंद राहणे व त्यावर अनेक विनंत्या करूनही मामलेदार व सरकारने त्याकडे दुर्लक्षच करणे दुर्दैवी आहे. गेले पंधरा दिवस या गावातील लोक तसेच बाहेरून येणारे भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी आतुर आहेत. त्यासाठी 48 तासांची दिलेली मुदत मंगळ. दि. 12 एप्रिल रोजी संध्या. 5 वा. संपत आहे. त्यापूर्वी जर मंदिर खुले झाले नाही, तर सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी लोक मंदिराकडे जमून पुढील कृती करणार आहे, असे बजरंग दलाचे हनुमंत च्यारी यांनी यावेळी म्हटले. राज्यातील सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता मयेवासीय व या देवीच्या भाविकांचा अंत पाहू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ठतुम्ही देशासाठी काहीतरी करा, आम्ही तुमच्यासाठी झटूठ असा संदेश दिला आहे. आज आम्ही या देशासाठी आणि आमच्या देव देवता व उत्सवांसाठी लढा देत आहेत. तेव्हा सरकारनेही या लोकांच्या भावना समजून घेत हे मंदिर खुले करावे, अशी मागणी भारत माता की जयचे गणेश गावडे यांनी केली.
आज मामलेदारांना निवेदन सादर करणार
बुधवारी मयेची प्रसिद्ध रेड्यांची जत्रा असल्याने मंदिर मंगळवार पर्यंत खुले करावे अशी मागणी करणारे निवेदन आज सोम. दि. 10 एप्रिल रोजी दु. 12 वा. मामलेदारांना सादर करणार आहे. मामलेदारांनी आपला अधिकार वापरत समितीकडून मंदिराची चावी घ्यावी व ते मंदिर उघडावे. तसेच समिती बरखास्त करावी. मामलेदार समिती बरखास्त करू शकत नसल्यास त्यांनी मंदिराची चावी घ्यावी व मंदिर खुले करावे. असे हरी नाईक यांनी यावेळी म्हटले. या समितीने पेठेच्या जत्रोत्सवापूर्वी आदल्या दिवशी कुलूप मारले होते ते हेतुपुरस्सरपणे मारले आहे. पंचायतन देवस्थान आहे तर एकच केळबाई देवीचेच मंदिर बंद का ? याचे उत्तर समितीला द्यावेच लागणार. याच देवीला काळोखात व बंदिस्त करून ठेवण्याचे कारण काय ? असाही आमचा प्रŽ आहे. गेले पंधरा दिवस हे मंदिर खुले व्हावे यासाठी आम्ही सरकारदरबारी प्रयत्न अरीतच आहोत, परंतु मामलेदारांनी अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली केलेल्या नाही. देवस्थान समिती म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे का ? मामलेदार प्रशासन यांना समितीसमोर काहीच किंमत नाही का ? असा सवाल यावेळी हरी नाईक यांनी उपस्थित केला. यावेळी नितीन गा•ाr, हरिश्चंद्र च्यारी, महादेव आरोंदेकर यांनीही आपले विचार मांडले.









