10 महिन्यांच्या उच्चांकावर : मेमध्ये 43 हजार कोटीची गुंतवणूक
वृत्तसंस्था / मुंबई
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी जूनमध्ये एकंदर 47 हजार 148 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअरबाजा त केली असल्याची माहिती समोर येते आहे. ही गुंतवणूक दहा महिन्यांच्या उच्चांकावर राहिली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
जूनमधील एकंदर गुंतवणुकीचा ओघ शेअरबाजारात चांगला राहिला आहे असे म्हणायला जागा आहे. पण दुसरीकडे जूनमध्ये गुंतवणूक वाढलेली असली तरी जुलैमध्ये गुंतवणुकीत मात्र त्यात घट राहण्याची शक्यता तज्ञांनी बांधली आहे. मे मध्ये 43 हजार 838 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक बाजारात झाली होती. 11,631 कोटी रुपये एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये 7936 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. पण दुसरीकडे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये गुंतवणूकदारांनी 34 हजार कोटींची रक्कम बाजारातून काढली होती. एक मात्र खरे की जूनमधील गुंतवणूक ही मागील दहा महिन्यातील सर्वोच्च मानली जात आहे.
विदेशी गुंतवणूक
मार्च 7,936 कोटी
एप्रिल 11,631 कोटी
मे 43,838 कोटी
जून 47,148 कोटी









